Nawab Malik News | ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मोठा दावा; म्हणाले – ‘एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे…’
मुंबई: Nawab Malik News | यंदाची विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) कोण जिंकणार ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. महायुतीला (Mahayuti) कोणत्याही परिस्थितीत सत्ता टिकवून ठेवायची आहे तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सत्ता उलथवून टाकायची आहे. मात्र सत्ता स्थापन करताना बहुमत कोणाला असेल? कोणते पक्ष एकत्र येत सरकार बनवतील हे गुलदस्त्यात आहे.
दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) नेते नवाब मलिक यांनी मोठा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ” निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. तसेच शरद पवार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले ही चुकीची बाब आहे. पण यावर आपल्याला आता काही बोलायचे नाही.”
ते पुढे म्हणाले, “मला अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने माझा राजीनामा घेतला नाही,
हे जरी खरे असले तरी त्यानंतर अजित पवार यांनी वैयक्तिक पातळीवर मला मदत केली.
त्यामुळे मी आज त्यांच्या पाठीशी उभा आहे.
जर मी मविआमध्ये थांबलो असतो तर मला तिकीटही मिळू शकले नसते.
मी राजकारणात नवखा नाही, त्यामुळे काय होऊ शकते, याची मला कल्पना आहे.
मला तिकीट दिल्यानंतर टीका होईल, याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी मला उमेदवारी दिली.
हे फक्त अजित पवारच करू शकतात”, असे नवाब मलिक यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा