NCP Shivsena MLA Disqualification Hearing | अजित पवार गटाच्या आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ‘ही’ दोन्ही प्रकरणे एकत्र ऐकली जाणार

NCP Shivsena MLA Disqualification Hearing

मुंबई : NCP Shivsena MLA Disqualification Hearing | शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर आमदार अपात्रतेचा मुद्दा समोर आला. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीत कोणत्याही पक्षाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यात आले नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाकडून (Sharad Pawar NCP) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेण्यात आली होती.

शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी एकमेकांचे आमदार अपात्र करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात अर्ज केले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे सोपवला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या शिंदे (Shivsena Eknath Shinde) आणि ठाकरे गटाकडून (Shivsena UBT) एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सप्टेंबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी जाहीर केला. पण राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलासा देतानाच, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नव्हते. (NCP Shivsena MLA Disqualification Hearing)

दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन्ही प्रकरणे एकामागोमाग एक असे ऐकू असे सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी सांगितले आहे. यावेळी अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या ४१ आमदारांना कोर्टाने नोटीस जारी केली आहे. आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली यावेळी शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला.

शिवसेना प्रकरणाची सुनावणी ३ सप्टेंबरला आहे. त्यामुळे ३ तारखेला हे प्रकरण कोर्टापुढे ऐकले जाण्याची शक्यता आहे.
३ सप्टेंबरला यावर सुनावणी झाली तर दाट शक्यता आहे
की सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा त्यापुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणी निकाल येईल.
जरी आमदार अपात्र झाले तरी ही अपात्रता फक्त ११ नोव्हेंबर पर्यंतच असेल असे मत सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Water Storage In Pune Dam | पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पाण्याचं टेन्शन मिटलं; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

Sharad Pawar | शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती पण…’

You may have missed