Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ‘शरद पवार आणि ठाकरेंमुळेच त्यांचे पक्ष…’ देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘आम्ही राजकारणात भजन करायला आलो नाही’

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

मुंबई: Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | राज्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे दोन पक्ष फुटल्याने राजकीय घडी विस्कटल्याचे चित्र आहे. पक्षात बंड झाल्यानंतर साधारणपणे दोन गट पडले. त्यानंतर सातत्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या बंडाला घेऊन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच मुद्यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना मुलाखत देताना भूमिका मांडली आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंमुळेच त्यांचे पक्ष फुटल्याचे वक्तव्य फडणवीसांनी केले आहे. (Maharashtra Politics News)

https://www.instagram.com/p/DAczJOtJDbk

“शिवसेनेत एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) जेव्हा हे जाणवलं की ज्या काही तडजोडी चालल्या आहेत त्या सगळ्या आदित्य ठाकरेंसाठी (Aditya Thackeray) चालल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंनाच पक्ष सोपवायचा आहे. एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढलं होतं ते कमी करुन आदित्य ठाकरेंकडे पक्ष सोपवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे शिवसेना फुटली.

https://www.instagram.com/p/DAcxXzNJqtS

शिवसेना मोठी झाली हिंदुत्वामुळे, हिंदुत्व सोडल्यानंतर लोकांकडे जाऊन मतं मागायची कशी? हा प्रश्न एकनाथ शिंदेंना पडला होता. त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडले आणि शिवसेना फुटली. आम्ही राजकारणात भजन करायला आलो नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आले तेव्हा आम्ही सरकार स्थापन केलं”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DAc1CHCJKCq

देवेंद्र फडणवीस म्हणाले, २१ जून २०२२ ला शिवसेना फुटली. एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत बंड केलं. त्यांना ४० आमदारांची साथ लाभली त्यानंतर महाविकास आघाडी सरकार गडगडलं. कारण २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

https://www.instagram.com/p/DAc4RxEpR04

यानंतर ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग अशा प्रकारे भेदण्यात आला. त्यानंतर २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीत येणं पसंत केले. त्यांच्यासह ४१ आमदारही महायुतीत आले”, असे फडणवीस यांनी म्हंटले.

https://www.instagram.com/p/DAc72wopjDz

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर बोलताना फडणवीस म्हणाले, “शरद पवारांचा पक्ष आम्ही फोडू शकतो का? ज्यांनी आयुष्यभर लोकांचे पक्ष फोडले त्यांचा पक्ष भाजपा कशी काय फोडू शकते? शरद पवारांचा पक्ष त्यांनीच फोडला. कारण नैसर्गिकदृष्ट्या त्यांचा वारसा त्यांनी इतक्या वर्षांपासून अजित पवारांकडे दिला होता.
https://www.instagram.com/p/DAdIfXjJ8ks/

आता त्यांना वाटलं की सुप्रिया सुळेंकडे वारसा असला पाहिजे. राजकारणात घराणेशाही असलेले पक्ष असतात त्यांची अवस्था अशीच होते. अजित पवारांना जेव्हा वाटलं की आता माझं राजकारणच संपेल त्यावेळी ते आमच्याबरोबर आले”, असे फडणवीसांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DAdLeMDi9Se

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)