Neelam Gorhe | विधानपरिषदेच्या 6 आमदारांचा विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजय! शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हेंकडून शुभेच्छांचा वर्षाव

neelam-gorhe

मुंबई : Neelam Gorhe | विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीने (Mahayuti) २०० चा आकडा पार करत घवघवीत यश मिळवलं आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विधानपरिषदेचे विद्यमान ६ सदस्य विजयी झाले आहेत. अशावेळी माहितीनुसार, दोन सदनांचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९५७ च्या अनुच्छेद ३ नुसार या नवनिर्वाचित ६ विधानसभा सदस्यांना विधानपरिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिध्द होताच आपोआप त्यांचे अगोदरचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द होते. (Maharashtra Assembly Election Results 2024)

या यादीत शिवसेनेचे (Shivsena Sinde Group) आमश्या पाडवी (Aamshya Padavi), भाजपचे (BJP) प्रवीण दटके (Pravin Datke), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Ajit Pawar NCP) राजेश विटेकर (Rajesh Vitekar) , भाजपचे रमेश कराड (Ramesh Karad) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) याची नावं आहेत. ते विधानपरिषदेत विद्यमान आमदार आहेत. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते बहुमताने निवडणून आले. अशा या खास प्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद सदस्य असलेल्या आणि आता विधानसभेवर निवडून गेलेल्या या ६ सदस्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या

Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

You may have missed