Neelam Gorhe | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट

Neelam Gorhe | Deputy Chief Minister Sunetra Pawar met Deputy Speaker Dr. Neelam Gorhe with a goodwill visit.

मुंबई : Neelam Gorhe | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान राज्यातील विविध सामाजिक, प्रशासकीय आणि महिलांसंबंधित प्रश्नांवर अनौपचारिक चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी परस्पर संवादातून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत विचारांची देवाणघेवाण केली.

ही भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून राज्यातील विविध विषयांवर सकारात्मक सहकार्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

You may have missed