New Rules Of Fastag | 1 ऑगस्ट पासून फास्टॅग चे नवे नियम लागू होणार ; जाणून घ्या कोणते होणार बदल
मुंबई : New Rules Of Fastag | फास्टॅग शी संबंधित सेवांवर १ ऑगस्ट पासून नवे नियम लागू केले जाणार आहेत. आता वाहन घेतल्यानंतर ९० दिवसांच्या आत वाहनाचा नोंदणी क्रमांक फास्टॅग नंबरवर अपलोड करावा लागणार आहे. निर्धारित वेळेत नंबर अपडेट न केल्यास तो हॉटलिस्ट मध्ये टाकला जाणार आहे. त्यानंतर ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळणार आहे.
पण त्यातही वाहन क्रमांक अपडेट न केल्यास फास्टॅगला ब्लॉक लिस्ट मध्ये टाकण्यात येईल. मात्र दिलासादायक बाब म्हणजे फास्टॅग सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना ३१ आक्टोबर पर्यंत पाच आणि तीन वर्षे जुन्या सर्व फास्टॅग सुविधा करावी लागणार आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) जूनमध्ये फास्टॅग संदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्वे जारी केली होती, ज्यामध्ये फास्टॅग सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी १ ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली होती.
आता कंपन्यांना सर्व अटींची पूर्तता करण्यासाठी १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत मिळणार आहे. नव्या अटींनुसार नवीन फास्टॅग आणि रि- फास्टॅग जारी करणं, सिक्युरिटी डिपॉझिट आणि मिनिमम रिचार्जशी संबंधित शुल्कही एनपीसीआयने निश्चित केले आहे.
फास्टॅग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांकडून याबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. अशा तऱ्हेने जे नवीन वाहन घेत आहेत किंवा ज्याचा फास्टॅग जुना आहे, अशा सर्वांचीच अडचण वाढणार आहे. यासोबत फास्टॅग वापरणाऱ्यांनाही आता सावध राहावं लागणार आहे.
कारण फास्टॅग ब्लॅक लिस्टिंगशी संबंधित नियमांवरही १ ऑगस्ट पासून परिणाम होणार आहे. मात्र त्याआधी कंपन्यांना एनपीसीआयने घालून दिलेल्या सर्व अटींची पूर्तता करावी लागणार आहे.
फास्टॅग कंपन्यांनी फास्टॅग सक्रिय राहावा असा नियम जोडला आहे. त्यासाठी तीन महिन्याच्या आत व्यवहार करणं आवश्यक आहे. व्यवहार झाला नाही तर तो डिसऍक्टिव्ह होईल. त्यानंतर पोर्टलवर जाऊन पुन्हा तो ऍक्टिव्हेट करावा लागेल. ज्यात टोल कापला जात नाही अशा मर्यादित अंतरासाठीच वाहन वापरणाऱ्यांसाठी हा नियम त्रासदायक ठरणार आहे.
किती शुल्क आकारता येईल ते खालीलप्रमाणे,
स्टेटमेंट – २५ रुपये/स्टेटमेंट
फास्टॅग बंद- १०० रुपये
टॅग मॅनेजमेंट- २५ रुपये/तिमाही
निगेटिव्ह बॅलन्स- २५ रुपये/ तिमाही
१ ऑगस्टपासून होणारे बदल खालीलप्रमाणे,
- कंपन्यांना प्राधान्याने पाच वर्षे जुना फास्टॅग बदलावा लागेल.
- तीन वर्षे जुना फास्टॅग पुन्हा केवायसी करावा लागणार.
- वाहन नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक फास्टॅगशी जोडावा लागेल.
- नवीन वाहन घेतल्यानंतर ९० दिवसांच्या आत त्याचा नंबर अपडेट करावा लागेल.
- फास्टॅग सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून व्हेईकल डेटाबेसची पडताळणी केली जाईल.
- केवायसी करताना वाहनाच्या पुढील आणि बाजूचा स्पष्ट फोटो अपलोड करावा लागेल.
- फास्टॅग मोबाईल नंबरला लिंक करणे बंधनकारक असेल.
- केवायसी पडताळणी प्रक्रियेसाठी ॲप व्हॉट्सॲप आणि पोर्टल सारख्या सेवा पुरवाव्या लागतील.
- कंपन्यांना ३१ आक्टोबर २०२४ पर्यंत केवायसी निकष पूर्ण करावे लागतील.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश