Nigdi Pune Crime News | कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले ! दहशत पसरविण्यासाठी 17 वाहनांची तोडफोड करणार्‍या दोघांना अटक

Arrest

पुणे : Nigdi Pune Crime News | दारु पिल्यानंतर हवेत गेलेल्या टोळक्याने तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या खिशातील पैसे काढून घेतले. त्यानंतर दहशत माजविण्यासाठी त्यांनी तब्बल १७ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police Station) दोघांना अटक केली असून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

अमर सिंग राजेंद्रसिंग जुन्नी (वय १८, रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी) आणि जयसिंग जलसिंग जुन्नी (वय १८, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत तेजस गणेश कांबळे (वय २४, रा. पंचक्षील सोसायटी, ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पंचक्षील सोसायटीजवळ रविवारी पहाटे एक वाजता घडली. या टोळक्याने २ रिक्षा, २ मिनी बस, २ हत्ती टेम्पो यांच्यासह १७ वाहनांच्या काचा फोडून २ लाख रुपयांचे नुकसान केले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अकबर शेख हे दोघे इमारतीच्या खाली बोलत थांबले होते. त्यावेळी बुलेटवरुन तिघे जण आले. त्यांनी शिवीगाळ करुन धमकी दिली. जयसिंग याने फिर्यादीचे दोन्ही हात पकडले. अमर याने त्याच्या हातातील लोखंडी कोयता फिर्यादीचे हातावर उलटा मारुन जखमी केले. त्यांच्या खिशातील १ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. जाताना हातातील कोयता, पालघन हवेत फिरवून मोठमोठ्याने आरडाओरडा करीत दहशत पसरविली. वाहनांची तोडफोड केली.

याबाबत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक देवरे यांनी सांगितले की, आरोपी अमर आणि जयसिंग हे चुलत भाऊ आहेत.
त्यांच्या बहिणीचा वाढदिवस असल्याने अमर याने जयसिंग याला निगडीला बोलावून घेतले होते.
वाढदिवस साजरा केल्यानंतर ते दारु पिले. त्यानंतर त्यांनी एका तरुणाला लुटले.
रस्त्यावर लावल्या वाहनांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 150 पेक्षा अधिक जागांवर लढण्याचा निर्धार ; बैठकीत मोठा निर्णय

Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन् संपवलं जीवन

Instagram Love Story | पंजाबच्या तरुणीचं रत्नागिरीच्या तरुणाशी इन्स्टावर प्रेम जडलं; पंजाबवरून रत्नागिरी गाठली अन्…

Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

You may have missed