Nilesh Lanke On Ajit Pawar | ‘आता शिळ्या कढीला…’, निलेश लंकेंचा अजित पवारांना खोचक टोला

Nilesh Lanke-ajit pawar

मुंबई : Nilesh Lanke On Ajit Pawar | निलेश लंके आमच्याकडून लोकसभा निवडणूक लढण्यास तयार होते मात्र त्यांना लोकसभा आणि त्यांच्या पत्नीला विधानसभा द्या, अशी अट लंके यांनी ठेवली होती असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. त्यावर निलेश लंके यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

यावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, “आता लोकसभेची निवडणूक झाली आहे. त्यामुळे त्या गोष्टीला काही अर्थ राहिला नाही. मी खासदार झालो तिकडे माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha) धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे देखील खासदार झाले आहेत. त्यामुळे आता शिळ्या कढीला ऊत आणणं चुकीचं आहे”, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

तसेच अजित पवार गटाच्या जागावाटपा बाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीमधील (Mahayuti) एका घटक पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा आणि महायुतीचा कुठल्या जागा कोणी लढवायच्या आणि कुठल्या जागा नाही लढवायच्या हा अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे आपण त्यावर भाष्य न केलेलं चांगलं. शेवटी आम्ही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने विधानसभेच्या जागा निवडून आणता येतील याचा विचार आम्ही करणं अपेक्षित आहे”, असं निलेश लंके म्हणाले. (Maharashtra Assembly Election 2024)

“निलेश लंकेंना संधी देण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते.
त्यांना लोकसभा हवी होती तर त्यांच्या पत्नीला विधानसभा अशी त्यांची मागणी होती.
तिथे भाजपाचे खासदार असल्याने भाजपाने लंकेंसाठी जागा सोडली नाही.
नगरची जागा धोक्यात असल्याची कल्पना दिली होती. भाजपाने ऐकले नाही.
पालकमंत्र्यांनी त्रास दिला यामुळे त्यांच्यासाठी काम करणार नाही अशी लंकेंनी भुमिका घेतली होती.
जवळच्या लोकांच्या क्रशर आणि खाणी बंद केल्याने आपल्याला फटका बसेल असे त्यांना वाटत होते,
यामुळे लंके शरद पवारांसोबत गेल्याचे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगत गौप्यस्फोट केला होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed