Nitesh Rane On Rahul Gandhi | ‘राहुल गांधींनी हिंदूंच्या भावना दुखावल्या, त्यांनी वारीत सहभागी होऊ नये’; नितेश राणेंचा इशारा

Nitesh Rane - Rahul Gandhi

मुंबई : Nitesh Rane On Rahul Gandhi | काँग्रेसचे नेते राहुल गांधी पहिल्यांदाच वारीत सहभागी होत आहेत. राहुल गांधी वारीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुरंदरचे आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण आहे. भारत जोडो यात्रा व न्याय यात्रेत राहुल गांधी पायी चालले होते. यामुळे वारीतही राहुल गांधी यांना आणल्यास त्याचा फायदा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) होईल अशी काँग्रेसची धारणा आहे.

शरद पवार यांच्यासह प्रणिती शिंदे (Praniti Shinde), धैर्यशील मोहिते (Dhairyasheel Mohit Patil) यांनी राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये नुकतीच भेट घेऊन वारीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले होते. मात्र आता राहुल गांधी यांनी वारीत सहभागी होण्याला आमदार नितेश राणे यांनी विरोध केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत हिंदू समाजाविषयी (Hindu Samaj) केलेल्या वक्त्यव्यामुळे नाराजी आहे. त्यामुळे त्यांनी वारीत सहभागी होऊ नये असा इशारा त्यांनी दिला आहे.

भाजप म्हणजे हिंदू नाही, मोदी म्हणजे हिंदू नाही, आरएसएस म्हणजे हिंदू नाही. हिंदू कधीच हिंसा करू शकत नाही, हे सांगताना राहुल गांधींनी प्रत्येक धर्मातील अभय मुद्राचा दाखल दिला होता. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालक बुद्धी म्हणून त्यांचा उल्लेख केला. दरम्यान काँग्रेसही राहुल गांधींच्या समर्थनात उभी राहिली.

राहुल गांधी पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्यावर भाजपाकडून विरोध होत आहे. याअगोदर भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी विरोध केला होता तर आता आमदार नितेश राणे यांनीही विरोध केला आहे.

नितेश राणे म्हणाले, “मणिपुरची स्थिती वाईट असती, तर तिथे जाऊन राहुल गांधी यांना फोटो काढता आले नसते.
लहान मुलांबरोबर फोटो काढले. हसत आहेत. खेळत आहेत. नाचत आहेत.
जसं मणिपुरला जाऊन फोटो काढले, तसे आमच्या वारीमध्ये येऊन फोटो काढू नका.
तशी हिंमत देखील त्यांनी करू नये. हिंदू समाजाला ते आवडणार नाही”.
खूप लोकं वाट बघून आहेत. थांबले आहेत, हे कधी वारीमध्ये चालणार, हिंदू समाज हा त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर दुखी आहे.
नाराज आहे. चिडलेला आहे.
म्हणून त्यांना स्वतःच्या सुरक्षेच्या विषयी काळजी असेल तर त्यांनी वारीमध्ये चालायला येऊ नये,
असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed