Nitesh Rane On Sanjay Raut | “फडणवीस नावाचं रसायन तुझ्या मालकाला चांगलंच कळलं असेल”, नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार

Sanjay Raut-Uddhav Thackeray

मुंबई : Nitesh Rane On Sanjay Raut | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) सत्ताधारी विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. ” शरद पवारांच्या (Sharad Pawar) डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे जवळजवळ शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही”, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. (Maharashtra Politics)

त्यावर “शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला १०० जन्म कळणार नाही” अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती.

त्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या डोक्यात काय सुरु आहे हे समजून घेण्यासाठी म्हणे फडणवीसांना १०० जन्म घ्यावे लागतील. फडणवीस नावाचं रसायन काय आहे हे तुझ्यापेक्षा तुझ्या मालकाला चांगलं कळलं असेल. त्यांचा मेंदू कसा चालतो तुझा मालकाला विचार. फडणवीस हे सर्वांचे बाप आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed