Nitin Gadkari | ‘मला विरोधी पक्षातील नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती’, नितीन गडकरींचा गौप्यस्फोट

नागपूर : Nitin Gadkari | विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्व. अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नितीन गडकरी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी एक घटना अचानक घडली. मी या घटनेमधील नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा?
मी संबंधित नेत्याला स्पष्टपणे सांगितले की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे”, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.
नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात की नाही, याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चा झाली आहे.
नितीन गडकरी यांचा कामाचा झपाटा आणि क्लीन इमेज
यामुळे पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची राजकीय वर्तुळात अधुनमधून चर्चा सुरु असते. (Nitin Gadkari)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली