Nitin Gadkari News | भाजपचे मेगा प्लॅनिंग! विधानसभा निवडणुकीसाठी नितीन गडकरी मैदानात; चार दिग्गज नेत्यांवर जबाबदारी
मुंबई : Nitin Gadkari News | लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता, महायुतीमधील (Mahayuti)अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), पंकजा मुंडे (Pankaja Munde), भारती पवार (Dr Bharti Pawar) अशा अनेक उमेदवारांचा समावेश होता. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले.
आता विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची रणनिती काय असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असतानाच भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मेगा प्लॅनिंग केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना संपूर्ण महाराष्ट्र हृदयापासून ओळखतो, त्यांच्यावर प्रेम करतो. विधानसभेत भाजपच्या विजयाकरता ते आता पूर्ण ताकदीनिशी उतरतील. गडकरींना मानणारा एक मोठा वर्ग आहे.
नितीन गडकरी आमचे बडे नेते आहेत. कोर ग्रुपचे प्राईम मेंबर आणि पार्लमेंटरी बोर्डचे देखील ते मेंबर आहेत. परिणामी, भाजपाच्या उज्वल भविष्याकरता, महायुतीचे सरकार आणण्याकरता नितीनजी पूर्ण एक महिना देणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
भाजपच्या वतीने चार दिग्गज नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे
या चार नेत्यांवर येत्या आठवड्याभरात २० स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे.
निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार आहेत.
तर अनेक भाजपचे नेते यांचा यात समावेश असणार आहे. याविषयी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी