Nitin Gadkari On Toll System | सध्याची टोल व्यवस्था रद्द ! नितीन गडकरींचा मोठा निर्णय; लवकरच सॅटेलाइट आधारित टोल संग्रह प्रणाली सुरू होणार
ऑनलाइन टीम – Nitin Gadkari On Toll System | केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शुकव्रारी सध्याची टोल व्यवस्था रद्द करून लवकरच सॅटेलाइट (Satellite Based Toll Collection) आधारित टोल संग्रह प्रणाली सुरू केली जाईल अशी घोषणा केली.
डिसेंबर 2023 मध्ये गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) चे लक्ष्य मार्च 2024 पर्यंत सॅटेलाइट आधारित टोल संग्रह प्रणाली सुरू करण्याचे असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात गडकरी यांनी सांगितले की, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय जागतिक नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) लागू करणार आहे. ही प्रणाली सुरूवातीला काही निवडक टोल नाक्यावर वापरण्यात येणार आहे. या नवीन प्रणालीचा उद्देश टोल कलेक्शन वाढवणे व टोल नाक्यावर होणारी गर्दी कमी करणे हा आहे. ही प्रणाली सुरूवातीला काही निवडक टोल नाक्यांवर वापरता येईल. (Nitin Gadkari On Toll System)
अशी असेल नवीन टोल प्रणाली
यापूर्वी एएनआय या न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले होते की, “आता आम्ही टोल समाप्त करत आहोत आणि सॅटेलाइट आधारिक टोल संग्रह प्रणाली आणणार आहोत. तुमच्या बँक खात्यातून पैसे कटतील आणि तुम्ही जितकी अंतर पार कराल, त्यानुसार शुल्क आकारले जाईल. यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल. नव्या सॅटेलाइट आधारित टोल कलेक्शन प्रणालीमुळे नागरिकांना बरेच फायदे मिळतील. मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ 9 तासांवरून 2 तासां पर्यंत घटला आहे. या प्रणालीमुळे टोल प्लाझावर होणारी गर्दी कमी होईल, वाहनचालकांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सुलभ होईल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता