Old Rajendra Nagar | कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्यामुळे IAS ची तयारी करणाऱ्या तिघांचा मृत्यू
दिल्ली: Old Rajendra Nagar | ओल्ड राजेंद्रनगर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन तरुणी असल्याची माहिती मिळत आहे. यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तिघांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये पाऊस सुरु होता. राव आयएएस स्टडी सर्कलच्या बेसमेंटमध्ये अचानक पाणी भरायला सुरुवात झाली. त्यामुळे लायब्रेरीत अभ्यास करण्यासाठी गेलेले ३५ विद्यार्थी त्याठिकाणी अडकले. काही विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून तेथून सुटका करून घेतली. पण, काही विद्यार्थ्यांना बाहेर निघता आले नाही. एनडीआरएफची टीम घटनास्थळी आली होती. त्यानंतर पाणी काढण्याचे काम सुरु झाले. पण, याला उशीर झाला होता. यामध्ये बुडून दोन तरुणी आणि एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत जीव गमवावा लागणाऱ्या तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलला पाठवले आहेत. यात मृत्यूमुखी पडलेला युवक हा केरळचा राहणारा होता. नेविन डाल्विन असे त्याचे नाव होते. मागील आठ महिन्यापासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी तून पीएचडीचे शिक्षण घेत होता. डाल्विन पटेल नगर मध्ये राहायचा. सकाळी १० वाजता तो लायब्ररीत अभ्यासाला गेला होता. तर तान्या सोनी, श्रेया यादव या २५ वर्षीय युवतींचाही यात मृत्यू झाला. श्रेयाने जुलै महिन्यात कोचिंग सेंटर मध्ये प्रवेश घेतला होता. ती यूपीच्या आंबेडकर नगर जिल्ह्यातील बरसावा हाशिमपूर गावात राहणारी होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओल्ड राजेंद्रनगरच्या एका कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशन संपले आहे. यामधून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिलेली आहे. याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका,
”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”
Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक
Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह
आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय