One Nation One Gold Rate Policy | सोने होणार स्वस्त! देशभरात असणार एकच भाव, ‘वन नेशन वन गोल्ड रेट’ धोरण नेमकं काय? जाणून घ्या
मुंबई : One Nation One Gold Rate Policy | देशात सोने, चांदीचा दर प्रत्येक राज्यात वेगळा असतो. त्यासाठी वेगवेगळा कर आकारला जातो. मात्र आता लवकरच देशातील सर्व राज्यांत तसेच शहरांत सोने, चांदीचा दर एकच असण्याची शक्यता आहे. म्हणजेच सोने-चांदीच्या दराच्या बाबतीत ‘वन नेशन वन गोल्ड रेट’ ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारतर्फे वन नेशन वन रेट हे धोरण राबवण्यावर विचार केला जात आहे. संपूर्ण देशात सोन्याचा दर एकच असावा, असे केंद्र सरकारचे मत आहे. या धोरणाला जेम अँड ज्वेलरी कौन्सिल (जेजेसी) नेही पाठिंबा दिला आहे.
हे धोरण लागू झाल्यानंतर देशात कोणत्याही भागात सोन्याचा दर एकच असेल. या धोरणामुळे सोन्याचे व्यापारी, ज्वेलर्स यांना देखील फायदा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे धोरण लागू करण्यासाठी देशातील अनेक ज्वेलर्सनेही सहमती दर्शवली आहे. (One Nation One Gold Rate Policy)
देशात वन नेशन, वन रेट लागू झाल्यानंतर पारदर्शकता येईल, असा दावा केला जातोय.
सध्या देशात सोन्याचा दर सगळीकडे वेगवेगळा असतो. त्यामुळे हा दर कुठे कमी असतो तर कुठे तो जास्त असतो.
अनेक ठिकाणी ज्वेलर्स मनमानी पद्धतीने सोन्याचा दर लागू करतात.
मात्र वन नेशन लागू झाल्यानंतर यावर लगाम बसू शकतो. सप्टेंबर मध्ये याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
या धोरणाच्या अंमलबजावणी नंतर तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात एकाच भावाने सोने खरेदी करू शकता.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार