Orchid International School Chinchwad | चिंचवडमधील ऑर्चिड स्कूलला दैनंदिन १० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस
पिंपरी : Orchid International School Chinchwad | चिंचवडमधील ऑर्चिड स्कूलला दैनंदिन १० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस शिक्षण विभागाने बजावली आहे. ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलच्या शालेय व्यवस्थापनाने २०२२ पासून शासन मान्यता न घेता परस्पर अनधिकृतरीत्या शाळा सुरू ठेवली आहे. यामुळे शासकीय नियमानुसार, दर दिवसाला नव्याने १० हजार याप्रमाणे दंड वसूल करण्याचा महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाला तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. त्या आधारे, शिक्षण विभागाने ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तरतुदीप्रमाणे शाळा दिवसागणिक दहा हजार रुपये दंड भरणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक यांच्याकडून अनधिकृत शाळांवर शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार शाळा बंद करणे, दंडात्मक कारवाई करणे, आवश्यकतेप्रमाणे एफआयआर दाखल करणे, शाळेच्या मिळकतीच्या ७/१२ वर आकारणी केलेल्या दंडाचा आर्थिक बोजा चढविणे, शाळा अनाधिकृत असल्याबाबत वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करणे, विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये सुयोग्य समायोजन करण्याबाबत निर्देश महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयास प्राप्त आहेत. (Orchid International School Chinchwad)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद