Pandharpur Assembly Constituency | मविआ कडून आपणालाच तिकीट मिळणार असल्याचा भगीरथ भालकेंचा दावा; तालुक्यातील 96 गावांसाठी जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात

Bhagirath Bhalke

पंढरपूर: Pandharpur Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) तयारी सुरु केलेली आहे. इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पंढरपूर- मंगळवेढ्यातही अशीच परिस्थिती असून महाविकास आघाडीकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी महाविकास आघाडीचे तिकीट आपल्यालाच मिळेल, असा दावा करीत आज पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील ९६ गावांसाठी जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. ‘नानांच्या जनसेवेचा रथ चालवेल आपला भगीरथ’ असे स्लोगन घेऊन आज पासून या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली.

भगीरथ भालके हे आज पासून २६ तारखेपर्यंत मंगळवेढ्यातील ७९ गावांना भेटी देत त्याच ठिकाणी मुक्काम करणार आहेत. यानंतर २७ ते २९ सप्टेंबर या दरम्यान पंढरपूर तालुक्यातील १७ गावात ही जन आशीर्वाद यात्रा जाणार आहे.

एका बाजूला विद्यमान आमदार समाधान अवताडे (Samadhan Autade) हे लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) आणि आपण केलेल्या विकास कामांची व आणलेल्या योजनांची माहिती देत गावोगावी फिरत आहेत. दरम्यान याचवेळी महाविकास आघाडीकडे दावा करणारे भगीरथ भालके यांनीही जनसंवाद यात्रा सुरू केल्याने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

या मतदारसंघात एकीकडे भगिरथ भालके इच्छुक आहेत. तर दुसरीकडे प्रशांत पारिचारक महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यातच अभिजीत पाटील (Abhijit Patil) माढ्यातून लढणार की पंढरपूर- मंगळवेढ्यात? याबाबत स्पष्टता आलेली नाही.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली

You may have missed