Pandharpur Assembly Constituency | विधानसभेच्या तोंडावर काका-पुतण्याचा वाद समोर; बाप्पाच्या आडून प्रचाराचा श्रीगणेशा

पंढरपूर: Pandharpur Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे अनिल सावंत (Anil Sawant) यांनी बाप्पाच्या आडून प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून आले आहे. शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतल्यानंतर दोन दिवसापूर्वी टेंभुर्णी येथे जयंत पाटील यांच्या स्टेजवर देखील अनिल सावंत यांनी हजेरी लावली होती.
आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंढरपूर (Pandharpur Assembly Constituency) शहरातील विविध भागात अनिल सावंत यांच्याकडून बाप्पाच्या मूर्तीचे मोफत वाटप करून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात येत आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी पुण्यात विधानसभेसाठी थेट शरद पवारांची भेट घेतली. पंढरपूर मंगळवेढा जवळच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा कारभार ते पाहतात. आमदारकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करत तुतारी हाती घेण्याचे मनसुबे अनिल सावंत यांचे दिसत आहेत.
विधानसभेच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अनिल सावंत
इच्छुक असून ही जागा सध्या भाजपकडे आहे. तेथे समाधान आवताडे आमदार आहेत.
भाजपचेच (BJP Leader) माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि भगीरथ भालके (Bhagirath bhalke) हे दोघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक असून यांचाही प्रयत्न राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याचा आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी