Pandharpur Assembly Constituency | पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शरद पवारांची वेगळीच खेळी; भाजपच्या उमेदवारीवर राजकीय समीकरणे अवलंबून राहणार

sharad-pawar

सोलापूर: Pandharpur Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातून तुतारी चिन्हावर लढण्यासाठी अनेकजण इच्छुक असताना शरद पवार हे प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, परिचारक हे अजूनही ‘वेट आणि वॉच’च्या भूमिकेत आहेत.

https://www.instagram.com/p/DBA7bJ9CAzj

वास्तविक समर्थकांकडून त्यांच्यावर राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी मोठा दबाव आहे. त्यामुळे परिचारक हे कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करणार की निष्ठा जपत भाजपमध्येच (BJP) राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
https://www.instagram.com/p/DBA9cYUi9FC/

भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत आपल्यावर अन्याय होणार नाही. आपल्याला यावेळी पक्षाकडून तिकीट मिळेल, असा विश्वास प्रशांत परिचारक यांना असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढ्यातील दौऱ्यात गैरहजर राहिलेले परिचारक यांनी अक्कलकोट मधील फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) कार्यक्रमाला मात्र आवर्जून हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

https://www.instagram.com/p/DBBELqmCMkO

प्रशांत परिचारक यांचे मन अजूनही भाजपमध्येच गुंतल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रयत्न सुरू असूनही परिचारक मात्र दाद द्यायला तयार नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Avtade) आमदार आहेत.

https://www.instagram.com/p/DBBNSJ3iWcv

मागील पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांना थांबवून आवताडे यांना संधी देण्यात आली होती. विद्यमान आमदार असल्याने उमेदवारीसाठी आवताडेंची दावेदारीही मजबूत मानली जात आहे. दुसरीकडे प्रशांत परिचारक हे आता थांबण्याच्या भूमिकेत नाहीत. त्यामुळे भाजपकडून कोणाला संधी दिली जाते यावरच पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. भाजपकडून आवताडे यांना पुन्हा संधी दिली, तर प्रशांत परिचारक हे शांत राहणार की तुतारी (Tutari) हाती घेणार हेही भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/DBBCQxvimXL

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP Leader To Mahayuti | अजित पवारांच्या नेत्याचा महायुतीला इशारा; म्हणाले – ‘मला उमेदवारी दिली नाही तर…’

Sharad Pawar NCP – Dhananjay Munde | शरद पवार धनंजय मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम करणार?; परळीत नव्या दमाचा उमेदवार रिंगणात उतरणार

Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्‍या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार

Ali Daruwala | भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला यांची पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या नियामक मंडळावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती

You may have missed