Pandharpur Assembly Election 2024 | पंढरपुरात समाधान आवताडेंना मविआचे आव्हान; प्रशांत परिचारक तुतारी हाती घेणार की अपक्ष लढणार? राजकीय वर्तुळात चर्चा

पंढरपूर: Pandharpur Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत जागावाटप उशिरा झाल्याने याचा महायुतीला (Mahayuti) फटका बसला. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी महायुतीत आतापासूनच जागावाटपावर चर्चा सुरु झाली आहे. त्यामध्ये मित्रपक्ष असलेल्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठका पार पडत आहेत. (Pandharpur Vidhan Sabha)
इच्छुक उमेदवार मतदारसंघात सभा-बैठका घेत आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाला (BJP) विजय मिळवता आला आहे. (Pandharpur Assembly Election 2024)
मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असाच सामना पाहायला मिळणार असून विद्यमान आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना कडवे आव्हान असणार आहे.
पंढरपूर मतदार संघावर अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. मागील अकरा वर्षे कै. आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या २०२१ च्या पोटनिवडणुकीत प्रथमच समाधान आवताडे यांच्या रूपाने भाजपला यश मिळाले आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी या मतदार संघात एमआयडीसी, उपसा सिंचन योजनेसह अनेक विकास कामे केल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. विरोधक मात्र त्यांच्या या कामावर समाधानी नाही. आजही पंढरपूर मतदार संघामध्ये रस्ते, वीज, पाणी यासारखे अनेक मूलभूत प्रश्न जैसे थे असल्याचे सांगत आहेत.
पंढरपूर- मंगळवेढा या मतदार संघांमध्ये नेहमीच मराठा समाजाचे (Maratha Samaj) वर्चस्व राहिले आहे. सर्वसामान्य मतदारांमध्ये सत्ताधारी भाजपा विषयी काही प्रमाणात नाराजीचा सूर आहे. तर विरोधी महाविकास आघाडी विषय देखील मतदारांमध्ये अजूनही संभ्रमावस्था आहे.
भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही गावोगावी जाऊन बैठका दौरे सुरू केले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ही जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी तुतारी (Tutari) हाती घ्यावी; अशी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली आहे.
परंतु परिचारक हे तुतारी हाती घेणार की अपक्ष निवडणूक लढवणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. तरीही खरी लढत परिचारक विरुद्ध अवताडे यांच्यात रंगणार आहे. सध्या विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे. तर भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक हे देखील निवडणूक लढवणार आहेत.
मात्र त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळेल की नाही? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपची उमेदवारी मिळाली नाही, तरी देखील ते निवडणूक लढवणार आहेत हे देखील तितकेच खरे आहे. सध्या महाविकास आघाडीकडून वसंत देशमुख, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, मंगळवेढ्याचे राहुल शहा, भगीरथ भालके आदी इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडे आदित्य फत्तेपूरकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP Leaders Unhappy | जागावाटपावरून भाजपातील 24 नेते अस्वस्थ; 4-5 जण पक्ष सोडण्याच्या तयारीत