Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojna | पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

Maharashtra Govt

पुणे : Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojna | महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरीता पालकांचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपये पेक्षा कमी असावे. भटक्या जमाती-क प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवासभत्ता, निर्वाह मता उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी ६० हजार, इतर महसुली विभागीय शहरे, उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात ५१ हजार रुपये, इतर जिल्ह्याचे ठिकाणी ४३ हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपये इतक्या रकमेचा लाभ देण्यात येतो.

सदर योजनेकरीता असलेला अर्ज महाविद्यालयात देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक माहिती सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे-६ येथे संपर्क करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालिका संगिता डावखर यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed