Pandit Vijay Ghate At Bhau Rangari Ganpati | पद्मश्री पंडित विजय घाटे यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

पुणे: Pandit Vijay Ghate At Bhau Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या दर्शनाला केवळ सामान्य लोकच नाही तर बॉलीवूड स्टार्स आणि इतर अनेक बडे सेलिब्रिटीही दर्शनासाठी पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)
पद्मश्री पंडित विजय घाटे यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून पद्मश्री पंडित विजय घाटे यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ या गजरात शहर दुमदुमत आहे. तर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दीही आहे. सर्वत्र उत्साह आणि नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा