Pankaja Munde – Puja Khedkar | पूजा खेडकर प्रकरणाशी नाव जोडल्याने पंकजा मुंडे संतप्त; म्हणाल्या…
मुंबई : Pankaja Munde – Puja Khedkar | प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. आता पूजा खेडकर प्रकरणाशी पंकजा मुंडे यांचे नाव जोडले जात आहेत. पंकजा मुंडेंनी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याकडून पैशांचा चेक स्वीकारल्याचा दावा केला जात आहे. पंकजा मुंडेंनी ट्रस्टसाठी हा चेक स्वीकारल्याचाही आरोप केला जात असताना त्यावर पंकजा मुंडे संतापल्याचे पाहायला मिळाले. याबाबत त्यांनी भाष्य करत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ” मीच कधीकधी माझ्याकडून जमतील तसे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला (Gopinath Munde Pratishthan) पैसे देत असते. पण अशा आरोपांमुळे मी अत्यंत व्यथित झाले आहे. मी निवडणुकीतील विजयाचा आनंद जनतेसोबत साजरा करत होते. पण हा आनंद काही लोकांना पाहावला नाही. पूजा खेडकर यांच्या बातम्या अनेक दिवसांपासून चालू आहे. पण कालच काही लोकांना काय साक्षात्कार झाला की त्यांनी ठरवलं की हे पंकजा मुंडेंशी जोडायचंय”, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली.
“कुणीतरी किरकोळ माणूस येऊन काहीतरी बोलतो. मागेही असंच झालं होतं. माझ्याविषयी बातमी झाली होती. तेव्हाही मी मानहानीचा दावा केला होता. कोणतीही खात्री न करता काही माध्यमांनी ही बातमी चालवली हे मी सहन करू शकत नाही. मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानसाठी खेडकर यांच्याकडून एक रुपयाचा निधी घेतलेला नाही. माझा या सगळ्याशी काय संबंध आहे?” असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला.
त्या पुढे म्हणाल्या, ” माझ्या कारखान्यावर जप्तीच्या कारवाया होतात. मी माझ्याच अडचणींमध्ये आहे.
एखाद्या व्यक्तीला बोगसपणे आयएएस करण्याइतकी मी मोठी नाही. मी प्रीतम मुंडेंचं तिकीट वाचवू शकले नाही.
मी स्वत: निवडून येताना माझी दमछाक झाली.
असं असताना मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यापेक्षा मोठी आहे
का की एखाद्या व्यक्तीला मी बोगसपणे आयएएस करू शकते? यात काही तर्क आहे का? हे करण्याची शक्ती माझ्याकडे गेल्या पाच वर्षांत नव्हती.
ती असती तरी मी तसं काही करणार नाही. इथून पुढे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत”, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
पूजा खेडकर चुकल्या असतील तर शिक्षा होईल. नसतील चुकल्या तर खरं-खोटं होईल,
असे म्हणत त्यांनी राज्यात खाजगी गाड्यांवर लाल दिवा लावणाऱ्यांबाबत जनहित याचिका टाकली पाहिजे असेही मुंडे म्हणाल्या.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक