Panshet Dam News | पानशेत धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पडून एकाचा मृत्यू ; कारण अस्पष्ट
पुणे: Panshet Dam News | पानशेत धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील कादवे गावच्या स्मशानभूमी जवळ एका व्यक्तीचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार (दि.२) रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. उत्तम रावजी पडवळ (वय. ३८, रा. कादवे, ता. राजगड,जिल्हा. पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूचे अद्याप स्पष्ट कारण कळले नसले तरी पाण्यात पाय घसरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
घटनेची माहिती पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टीमला दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य तानाजी भोसले, गणेश सपकाळ, वैभव भोसले, संजय चोरघे पाटील, संदीप सोळसकर, आकाश सोळसकर, मनोज शिंदे, प्रतीक महामुनी, सुरज कवडे, सागर बावळे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून वेल्हे पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा