Parbhani Crime News | सहा महिन्यापूर्वी वडिलांचे निधन, ट्रॅक्टरचे हेड पलटी झाल्याने मुलाचाही मृत्यू ; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
परभणी : Parbhani Crime News | सहा महिन्यापूर्वी वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले या दुखातून कुटुंब कसेबसे सावरत असताना सेलू ते सातोना दरम्यान हादगांव पावडे शिवारात रविवारी (दि.११) रेल्वे रुळ ओढण्याच्या कामात ट्रॅक्टर अंगावर पडून मुलाचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर दुहेरी दुखाचा डोंगर कोसळला. सुरेश प्रल्हाद जाधव (३०, रा.वरफळ ता.परतुर ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वाहन निष्काळजीपणाने चालवून स्वतः मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात भा.न्या.स कलम १०६ नुसार सुरेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Crime News)
वरफळ येथील सुरेश प्रल्हाद जाधव हा चालक म्हणून सेलू ते सातोना दरम्यान ट्रॅक्टरने रूळ ओढण्याचे काम करीत होता. रविवारी हादगांव पावडे शिवारात काम करताना ट्रॅक्टरचे हेड पलटी होऊन अंगावर पडल्याने सुरेश प्रल्हाद जाधव याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु