Parbhani Crime News | प्लॉट नावावर का करून देत नाही?, संतापलेल्या मुलाने पहारीने वार करत वडिलांना संपवलं

Murder

परभणी : Parbhani Crime News | प्लॉट नावावर का करून देत नाही? या कारणावरून संतापलेल्या मुलाने डोक्यात लोखंडी शस्त्राने वार करत वडिलांचा निर्घृण खून केला. शेख आमीन शेख पीर अहेमद (वय-६५) असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. शेख अकबर शेख आमीन असे आरोपीचे नाव आहे. ही घटना बुधवार (दि.२२) पावणे सहा वाजताच्या दरम्यान घडली. (Murder Case)

मिळालेल्या माहितीनुसार, कलमुला येथे संशयित शेख अकबर शेख आमीन याने बुधवार (दि.२२) नवी आबादी कलमुला येथील प्लॉट माझ्या नावावर करुन दे म्हणून वाद घातला. यावेळी त्याने शेख आमीन शेख पीर अहेमद यांच्या डोक्यात लोखंडी सबल (पहार) हाणून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर मुलगा पसार झाला होता.

दरम्यान, घटनास्थळी चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि नरसिंग पोमनाळकर, कच्छवे, राठोड, आईटवार, तोंडेवाड, मिटके यांनी धाव घेतली. गंभीर जखमी वडिलांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच चुडावा पोलीस ठाण्यात फिर्याद देणारे शेख अफसर शेख रशीद (वय ३५, रा. कलमुला) यांनाही संशयिताने जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी संशयित शेख अकबर शेख आमीन याच्या विरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नरसिंग पोमनाळकर करत आहेत. (Parbhani Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)

Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

You may have missed