Parli Assembly Election 2024 | धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांची राजकीय खेळी; मराठा समाजाचा उमेदवार देणार आव्हान

बीड : Parli Assembly Election 2024 | परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्यासोबत यंदा पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे देखील पाठबळ असणार आहे. असे असताना आता महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) देखील तगडा उमेदवार दिला आहे.
परळी विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाला मिळाला आहे. परळीमधून तगडा आणि मराठा समाजाचा (Maratha Samaj) उमेदवार देऊन शरद पवार यांनी नवी रणनीती आखली आहे. परळीमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी थेट लढत होणार आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात शरद पवार कोणाला संधी देणार याची उत्सुकता लागली होती.
दरम्यान, आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तिसऱ्या यादीमध्ये परळीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. परळीमधून राजेसाहेब देशमुख (Rajesaheb Deshmukh) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार असून जोरदार रंगणार असल्याची चर्चा आहे.
शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार दिला आहे. राजेसाहेब देशमुख यांनी महिन्याभरापूर्वी कॉंग्रेस पक्षाला सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते.
मात्र त्यांनी पक्षाची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला.
आता त्यांना शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यामुळे परळीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha Vs OBC) अशी लढत होताना दिसणार आहे. (Parli Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण