Parner Assembly Constituency | राणी लंकेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत कलह; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा, म्हणाले – ‘मविआला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही’
पारनेर : Parner Assembly Constituency | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) घोषणा झाली आहे. त्यानुसार, येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची (Sharad Pawar NCP) उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वाद उफाळून आला आहे. पारनेरमधून राणी लंके (Rani Nilesh Lanke) यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) नाराजी आहे. महाविकास आघाडीला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
पारनेर मतदारसंघात खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांना महाविकास आघाडीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेला खासदार लंके यांना मदत करून देखील पारनेरची जागा शिवसेनेला न सोडता पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लंके यांच्या घरातच उमेदवारी दिल्याने शिवसेनेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
यावरुनच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्यासह पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते बंडाच्या तयारीत असून
येत्या दोन दिवसात नगर जिल्ह्याच्या नगर शहर, श्रीगोंदा आणि
पारनेर मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिवसेनेला जिल्ह्यात दुजाभाव मिळत असल्याने आता शिवसेना महाविकास आघाडीला मातीत घातल्याशिवाय
तसेच त्यांचे वाटोळं केल्याशिवाय राहणार नसल्याची तीव्र प्रतिक्रिया संदेश कार्ले यांनी दिली आहे. (Parner Assembly Constituency)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण