Parvati Assembly Constituency | पर्वती मतदारसंघात श्रीनाथ भिमालेंनी दंड थोपटले

पुणे: Parvati Assembly Constituency | लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदललेली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे (Maharashtra Assembly Election 2024). इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी सुरु केलेल्या आहेत. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) यंदा पुणे शहरावर विशेष लक्ष असणार आहे. आता पुण्यातील पर्वती मतदारसंघातील नगरसेवक श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale) यांनीही दंड थोपटल्याने भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांचं टेन्शन वाढलं आहे.
दरम्यान, लढणार आणि जिंकणार या टॅगलाईनचा भिमाले यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये भिमाले विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. याबाबत बोलताना भिमाले म्हणाले, “माझ्या कार्यकर्त्यांनी माझा व्हिडिओ शेअर केला आहे, तो व्हिडिओ खरा असून माझं लोकसभा निवडणुकीपासूनच ठरलंय की मला यावेळी विधानसभा लढायची हे मी वरिष्ठांच्या कानावर घातलं आहे.
माझी विधानसभेसाठी माझी मागील वीस वर्षांपासून तयारी सुरु आहे. मी पुण्याचा प्रभारी म्हणून काम करतोय.
या मतदारसंघातील लोकांशी माझी नाळ असून मला वरिष्ठांकडून आशा आहे, ते मला संधी देतील.
मी विधानसभा लढणार आणि जिंकणार”; असे भिमालेंनी स्पष्ट केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर