Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली, ‘यंदा विजय आपलाच’, अश्विनी कदम यांचा विश्वास (Video)

Supriya Sule-Ashwini Nitin Kadam (1)

पुणे : Parvati Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. शहरातील चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे पर्वती विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून (Mahayuti) माधुरी मिसाळ (Madhuri Misal), मविआ कडून अश्विनी नितीन कदम (Ashwini Nitin Kadam) तर अपक्ष म्हणून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अश्विनी कदम निवडणूक लढत आहेत. दरम्यान त्यांनी मतदारसंघात प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला आहे. पदयात्रा, रॅली, बैठका, संवाद सत्र, अशा विविध माध्यमातून त्या मतदारसंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

https://www.instagram.com/reel/DCLvDy5pwQ4/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

पर्वती विधानसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी अश्विनी कदम यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला. ‘पर्वती मतदारसंघात यंदा तुतारी वाजणार’, असा विश्वास कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी व्यक्त केला.

अश्विनी कदम म्हणाल्या, लोकांचा जनसमुदाय,
आपुलकीने केलेले स्वागत आणि माझ्याकडे एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून बघणारी नजर या सगळ्याने मी भारावून गेली आहे.
यंदा विजय आपलाच, असा विश्वास अश्विनी कदम यांनी व्यक्त केला आहे. (Parvati Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)

You may have missed