Parvati Assembly Election 2024 | “यंदा पर्वती मतदारसंघात परिवर्तन घडवा”, आबा बागुल यांचे मतदारांना आवाहन

Aba Bagul

पुणे: Parvati Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. मतदानासाठी अवघा एक आठवडा प्रचारासाठी शिल्लक राहिला असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत.

यंदा पर्वती विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपच्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal), तुतारीकडून अश्विनी कदम (Ashwini Kadam) तर अपक्ष म्हणून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.

दरम्यान (दि.७) अप्पर इंदिरानगर डेपो,सुपर २७६, अप्पर ओटा, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, बिबवेवाडी ओटा परिसरात पदयात्रा काढून अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी ठिकठिकाणी बागुल यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला.

आबा बागुल म्हणाले, ” आपले असेच प्रेम माझ्यावर निरंतर ठेवा. यंदा पर्वती मतदारसंघात परिवर्तन घडवा. लक्षात ठेवा ‘हिरा’ निशाणी, म्हणत आबा बागुल यांनी मतदारांना आवाहन केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Shelke MLA | अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळकेंच्या अडचणीत वाढ, शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Shivaji Nagar Assembly | सुरक्षा आणि वाहतूक कोंडी सोडविण्यात शिवाजीनगरमधील आमदार, नगरसेवकांना आले अपयश

Parvati Assembly Election 2024 | ‘मतदारसंघातील जनता विजयाची तुतारी वाजवणारच’, अश्विनी कदम
यांचा विश्वास, पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग

hhagan Bhujbal On ED And BJP | ‘ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही भाजपबरोबर’, भुळजबळांच्या दाव्याने
राजकारणात खळबळ; म्हणाले – “मी OBC असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे, उच्च जातीचा असतो तर…’

Pune ACB Demand Trap News | जॅमर काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या सहायक फौजदारासह ट्राफिक वॉर्डनवर गुन्हा दाखल

You may have missed