Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांना कलाकारांचा पाठिंबा; ” भविष्यात कलाक्षेत्रासाठी मोठे काम उभारणार”, बागुल यांचे आश्वासन
पुणे : Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी निवडणूक पाहायला मिळत आहे. महायुतीकडून (Mahayuti Candidate) माधुरी मिसाळ (Madhuri Misal), महाविकास आघाडीकडून (MVA Candidate) अश्विनी कदम (Ashwini Kadam) तर अपक्ष उमेदवार म्हणून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघात आबा बागुल यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. सलग ६ वेळा ते नगरसेवक असलेले आबा बागुल आता आमदार व्हायचेच या इराद्याने कामाला लागले आहेत.
बागूल यांनी पर्वती मधील माता-भगिनींसह नागरिकांची घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. पदयात्रा, प्रचार रॅली, बैठका, सभा यांच्या माध्यमातून ते नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आबा बागुल यांचे कला आणि सांस्कृतिक क्षेत्राशी माझे जुने संबंध आहेत. दरम्यान बागुल यांच्याशी हृद्य स्नेहबंध असणाऱ्या पुण्यातील नामांकित कलाकारांचा ‘स्नेहमेळावा’ सातारा रोडवरील वाळवेकर लॉन्स येथे पार पडला. यावेळी पर्वती मतदारसंघातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्वतीच्या विकासासाठी व प्रगतीसाठी आम्हा सर्वांचा पाठिंबा तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास यावेळी कलाकारांनी दिला.
आबा बागुल म्हणाले, कलाकारांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असून भविष्यात कलाक्षेत्रासाठी मोठे काम उभारणार आहे.
२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानावेळी पाठीशी आपल्या प्रेमाची शक्ती उभा करण्याचे आवाहन यावेळी आबा बागुल यांनी केले. (Parvati Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”