Parvati Assembly Election 2024 | ‘पहाटेचा संवाद’ या माध्यमातून अश्विनी कदम यांचा तळजाई टेकडीवर नागरिकांशी संवाद; म्हणाल्या – ‘संवाद’ हा शब्द लहान वाटत असला तरी…

Ashwini Kadam

पुणे: Parvati Assembly Election 2024 | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. निवडणुकीच्या प्रचाराला अवधी कमी असताना मध्येच दीपावली सणाचे महत्त्वाचे चार दिवस आल्याने या कालावधीत प्रचाराला खंड पडला आहे. (Parvati Assembly Election 2024)

https://www.instagram.com/p/DB6EQHLJryc

सभा, पदयात्रा, संपर्क दौरा, जाहीर सभा, महिलांचे हळदी-कुंकू कार्यक्रम आदी प्रचार कार्यक्रमांना लोक उपस्थित राहण्याची शक्यता अंधुक असल्याने प्रचाराचे तंत्र काही प्रमाणात बदलले आहे.

याचाच भाग म्हणून पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार अश्विनी नितीन कदम (Ashwini Nitin Kadam) यांनी आज (दि.३) ‘पहाटेचा संवाद’ या माध्यमातून तळजाई टेकडीवर (Taljai Tekdi) नागरिकांशी संवाद साधला आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार अश्विनी कदम म्हणाल्या,” ‘संवाद’ हा शब्द लहान वाटत असला तरी कितीतरी सामर्थ्य या शब्दात दडले आहे. म्हणूनच नेहमीच माझा प्रयत्न हा संवादाचा राहिला आहे. त्यातूनच ‘पर्वती संवाद’चे आयोजन करण्यात आले होते.

या संवादातून नागरिकांचे प्रश्न कळतात, त्यावर उपाय शोधण्याची उमेद मिळते. म्हणून ‘पहाटेचा संवाद’ या माध्यमातून नागरिकांशी तळजाई टेकडीवर पहाटे प्रसन्न मनाने लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला”, अशी प्रतिक्रिया अश्विनी कदम यांनी दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | ‘उमेदवार द्यायचा नाही आता कोणाला पाडायचं ते पाडा’, मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले – ‘गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू’

Pune Politics News | इच्छुकांची नाराजी दूर झाली पण त्यांच्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते अद्याप संतप्तच?

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…