Parvati Assembly Election 2024 | ‘वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कटिबद्ध’, आबा बागुल यांचे आश्वासन; म्हणाले – ‘पर्वती मतदारसंघ टँकरमुक्त करणार’
पुणे: Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मविआ कडून अश्विनी कदम (Ashwini Kadam), महायुतीकडून माधुरी मिसाळ (Madhuri Misal) तर अपक्ष म्ह्णून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान तिन्ही उमेदवारांकडून जोरात प्रचार सुरू आहे.
हिरा हे निवडणूक चिन्ह असलेल्या आबा बागुल यांनी नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला आहे. पर्वती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल हे गेली ३२ वर्षे महापालिकेत अपराजित नगरसेवक आहेत.
प्रचारादरम्यान मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यांनी सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग शीघ्रगतीने मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.
पर्वती मतदारसंघ टँकरमुक्त करून सर्वांना वेळेवर पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. विजयी झाल्यावर हा परिसर टँकर माफियामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
आबा बागुल म्हणाले, ” आपल्या भागातील विकासाबाबत काही कल्पना असतील, अडचणी असतील त्या वाळवेकर लॉन्स येथील जनसंपर्क कार्यालयात आणून द्याव्यात, त्याचे निराकरण निवडून आल्यावर केले जाईल” , असे आवाहन बागुल यांनी नागरिकांना केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!
Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)