Parvati Assembly Election 2024 | ‘आबांच्या दूरदृष्टीने मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व्हिजन तयार’, पर्वती मतदारसंघात हेमंत बागुल यांचा नागरिकांशी संवाद
पुणे : Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून माधुरी मिसाळ (Madhuri Misal), महाविकास आघाडीकडून अश्विनी कदम (Ashwini Nitin Kadam) तर अपक्ष उमेदवार म्हणून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघात आबा बागुल यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. सलग ६ वेळा ते नगरसेवक असलेले आबा बागुल आता आमदार व्हायचेच या इराद्याने कामाला लागले आहेत. बागूल यांनी पर्वतीमधील माता-भगिनींसह नागरिकांची घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. पदयात्रा, प्रचार रॅली, बैठका, सभा यांच्या माध्यमातून ते नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान आबा बागुल यांच्या प्रचारार्थ प्रचारप्रमुख व आर्किटेक्ट हेमंत बागुल (Hemant Bagul) यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील गणेश मळा, पानमळा, दांडेकरपूल येथील नागरिकांशी संवाद साधला. सर्वसमावेशक विकासासाठी आपण एकत्र आले पाहिजे आणि आपले प्रश्न आपणच सोडविण्यासाठी यंदा बदल घडवला पाहिजे.
आबांच्या दूरदृष्टीने मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व्हिजन तयार असल्याचेही हेमंत बागुल यांनी यावेळी मतदारांशी बोलताना सांगितले.
तसेच ‘हिरा’ या निशाणी समोरील बटन दाबून आबांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. (Parvati Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”
Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार
Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ