Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; राजेंद्र शिळीमकरांची गैरहजेरी, नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Madhuri Misal - Rajendra Shilimkar

पुणे: Parvati Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघतून भाजपच्या (BJP) विद्यमान आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सारसबाग येथील गणपती आणि महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन मिसाळ यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला. (Parvati Assembly Election 2024)

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मार्केट यार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पद्मावती, अण्णा भाऊ साठे स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, बाळासाहेब ठाकरे स्मारक, अहिल्यादेवी होळकर स्मारक या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.

” सलग चौथ्यांदा भाजपच्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. गेली पंधरा वर्षे केलेली विकासकामे आणि सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने विजयी होऊ, असा विश्वास वाटतो”, अशी प्रतिक्रिया मिसाळ यांनी दिली आहे.

मात्र, हा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप नेते,
पुणे शहराचे सरचिटणीस राजेंद्र शिळीमकर (Rajendra Shilimkar)
यांची उपस्थिती पाहण्यास मिळाली नाही. त्यामुळे शिळीमकर हे नाराज असल्याच्या चर्चा
मतदारसंघात सुरु झाल्या आहेत. त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, राजेंद्र शिळीमकर यांच्या नाराजीचा फटका २० नोव्हेंबरच्या मतदानावर दिसू शकतो अशी कुजबुजही मतदारसंघात सुरु आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baramati Assembly Election 2024 | ‘बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील’, युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे त्यानुसार…’

Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार

Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा

You may have missed