Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघात बंडखोरी रोखण्याचे मविआचे प्रयत्न निष्फळ; आबा बागुल निवडणूक लढण्यावर ठाम; होणार तिरंगी लढत

पुणे: Parvati Assembly Election 2024 | यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून तीन-तीन पक्ष एकत्रित आल्याने नाराजांची संख्या वाढल्याचे चित्र होते. इच्छुक असताना उमेदवारी न मिळाल्याने तसेच मतदारसंघ मित्रपक्षाला सुटल्याने नाराज असलेल्या नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले. (Parvati Assembly Election 2024)
या अपक्ष उमेदवारांची समजूत घालण्यासाठी पक्षाकडून विविध यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून यांची समजूत घालण्यात काही पक्षांना यश आलं आहे तर काही पक्ष अपयशी ठरले आहेत. पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास महायुतीला सर्व विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात तसेच नाराजांची समजूत काढण्यात देखील यश आले आहे.
मात्र पुण्यात काँग्रेस पक्षाकडून (Congress) सर्वाधिक बंडखोरी पाहायला मिळत आहे. कसबा (Kasba Peth Assembly), शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly) आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातून कॉग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले होते. पर्वती विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP)
अश्विनी कदम (Ashwini Nitin Kadam) यांना उमेदवारी देण्यात आली होती.
मात्र याठिकाणी काँग्रेसचे आबा बागुल (Aba Bagul) देखील निवडणूक लढण्यास इच्छुक होते.
त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
आज (दि.४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती.
मात्र आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने या मतदारसंघात तिरंगी निवडणूक होणार आहे.
या मतदारसंघात महाविकास आघाडीने बंडखोरी रोखण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा