Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघात भारतीय एकात्मता संघटना, महाराष्ट्र संस्थेचा अश्विनी कदम यांना जाहीर पाठिंबा
पुणे : Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धडाका उडाला आहे. या मतदारसंघात प्रामुख्याने तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून माधुरी मिसाळ, महाविकास आघाडीकडून अश्विनी नितीन कदम (Ashwini Nitin Kadam) तर अपक्ष उमेदवार म्हणून आबा बागुल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुतारी चिन्हावर निवडणुकीस सामोरे जात असलेल्या अश्विनी कदम यांना मतदारसंघातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात नुकतीच सभा पार पडली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
पर्वतीला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी बदल गरजेचा आहे. हा बदल तुतारीच करू शकते. त्यामुळे यंदा तुतारीच वाजणार अशी मतदारसंघातील नागरिकांची भावना आहे. अश्विनी कदम मतदारसंघातील नागरिकांच्या घरोघरी जात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान आता भारतीय एकात्मता संघटना, महाराष्ट्र या संस्थेनेही अश्विनी नितीन कदम यांना अधिकृतरित्या पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे कदम यांची ताकद आणखीनच वाढली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इस्माईलभाई शेख, उपाध्यक्ष महाराष्ट्र महेमुदअली सय्यद, युवा अध्यक्ष दिपक शंकर खरात, पुणे शहर अध्यक्ष जयकुमार राघवाचारी,
जेष्ठ नेते अमिन खान, कोषाध्यक्ष सबा इस्माईल शेख, महिला अध्यक्षा कविता डाडर, पुणे शहर उपाध्यक्ष सलमान शेख,
कार्याध्यक्ष शरद अडागळे, हातगाडी उपाध्यक्ष फिरोज बागवान, हडपसर अध्यक्षा रिहाना अन्सारी,
सदस्य वनिता गायकवाड तसेच अशरफ समरुदीन शेख यांचे अश्विनी कदम यांनी आभार मानले आहेत. (Parvati Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”,
सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”
Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”
Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार
Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ