Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघातील मविआच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मातंग एकता आंदोलन संघटनेचा जाहीर पाठिंबा

Ashwini Kadam

पुणे : Parvati Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबरला मतदान असल्याने आता अवघे सात दिवस बाकी आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. सभा, बैठका, पदयात्रा, रॅलीच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून अश्विनी कदम (Ashwini Kadam), महायुतीकडून माधुरी मिसाळ (Madhuri Misal) तर अपक्ष उमेदवार म्हणून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

२० नोव्हेंबरला मतदान असल्याने आता प्रचारासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे मतदारसंघात उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटना व मातंग समाजाच्या विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

मातंग एकता आंदोलन संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे, राज्याचे समन्वयक विठ्ठलराव थोरात,
महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षा रुक्मिणी धेडे, रावसाहेब खवळे, राजू गायकवाड, सचिन जोगदंड,
रवी क्षीरसागर तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (Parvati Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed