Parvati Pune Crime News | नशेची औषधे दुसर्‍याच्या नावावर मागवून विकण्याचा धक्कादायक प्रकार ! उत्पादक औषध कंपनीच्या भागीदारासह चौघांवर गुन्हा दाखल

parvati police station

पुणे : Parvati Pune Crime News | जे औषध घेतल्यामुळे नशा येऊ शकते तसेच जी घेणे धोकादायक अशी औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकता येत नाही, असे असताना दुसर्‍या मेडिकल स्टोअर्सच्या नावाने औषधे मागवून ती बेकायदेशीरपणे नशेसाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी (Parvati Police) उत्पादक औषध कंपनीच्या भागीदारासह चौघांवर गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून (Food & Drug Administration Pune) औषध निरीक्षक शामल महिंद्रकर यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी समीर हमीद शेख Sameer Hameed Shaikh (रा. सोलापूर), समरीन समीर शेख Samreen Sameer Shaikh (रा. कोंढवा), धीरेंद्र दिनेश प्रसादसिंग (Dhirendra Dinesh Prasadsingh) आणि राजीव वसंतलाल देढीया Rajeev Vasantlal Dedhia (दोघे रा. भिवंडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी, विरेन सावला यांची महाराष्ट्र एजन्सी हे पर्वतीमध्ये औषधाचे दुकान आहे. त्यांच्यावर नावावर कोडीनयुक्त लेकारेक्स टी सिरप हे औषध खरेदी केल्याचे बिल पाठविले. त्यांनी ई मेलद्वारे भिवंडीतील औषध उत्पादक कंपनी बालाजी फार्मा केअर यांना कळविले की आम्ही अशी ऑर्डर दिलेली नाही. त्यानंतर पुन्हा याच औषधाचे आणखी एक बिल त्यांना पाठविले. विरेन सावला यांना संशय आला की डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय जे औषध विकता येत नाही, ते बाहेर परस्पर नशेसाठी विक्री करण्यासाठी आपल्या नावावर बिल करुन पाठविले जात आहे. त्यांनी अन्न व औषध विभागाकडे तक्रार केली.

त्यांनी भिवंडीतील बालाजी फार्मा केअरमध्ये चौकशी केल्यावर महाराष्ट्र एजन्सीच्या नावाने समीश शेख या व्यक्तीने ही खरेदी केली असल्याचे सांगण्यात आले. त्याचे नॅशनल मेडिको, कोंढवा हे दुकान असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे औषध निरीक्षकांनी कोंढव्यात जाऊन तपासणी केल्यावर असे दुकानच अस्तित्वात नसल्याने आढळून आले.

त्यानंतर अन्न व औषध विभागाचे ठाणे कार्यालयातील औषध निरीक्षक बनकर यांनी भिवंडीतील बालाजी फार्मा केअर येथे भेट दिली. त्यावेळी कंपनीचे भागीदार धीरेंद्र प्रसाद सिंग यांनी समीर शेख याने पाठविलेली ऑर्डरची कॉपी दाखविली. त्यात त्याने महाराष्ट्र एजन्सीचा बनावट शिक्का मारुन ही ऑर्डर दिली.

तसेच कुरीयरच्या गोदामातून परस्पर औषधे प्राप्त केली. सावला यांनी आपण या औषधांची ऑर्डर दिली
नसल्याचे कळवूनही त्यांच्या नावाने पुन्हा दुसरी ऑर्डर पाठविल्याचे दिसून आले.
त्यामुळे बालाजी फार्मा केअरने समीर शेख याच्याशी संगनमत करुन नशेसाठी सेवन
करण्यासाठी २ लाख ८९ हजार ८०० रुपयांच्या या औषधांचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी कंपनीच्या दोघा भागीदारांसह समीर शेख व त्याची पत्नी समरीन शेख
यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार (PSI Sachin Pawar)
अधिक तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed