Parvati Pune Crime News | पूर्व वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : Parvati Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बाजूच्या इमारतीच्या टेरेसवरुन पाहणार्या नागरिकाने फिर्याद दिली आहे. (Attempt To Murder)
सुरज शिवाप्पा चलवादी ( रा.पानमळा वसाहत, सिंहगड रोड) असे जखमी झालेल्याचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी बालाजी हनुमंत कांबळे (वय २६, रा. लक्ष्मीनगर, दांडेकर पुल) आणि सुहास सतिश भालेराव (वय २६, रा. जयमल्हार, दांडेकर पुल) या दोघांना अटक केली आहे. (Parvati Pune Crime News)
याबाबत नरेश रामलु गुंतल (वय २९, रा. कांदेआळी, जनता वसाहत) यांनी पर्वती पोलिसांकडे (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना रामकृष्ण मठाचे मागे कॅनॉल रोडवर शनिवार रात्री सव्वा दहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराचे टेरेसवर थांबले होते. त्यावेळी त्याच्या घराचे समोरुन जाणार्या कॅनॉलचे पलीकडील रोडवर एका लाईटच्या खांबाजवळ भांडण चालू असल्याचे त्यांनी पाहिले. दोघा जणांनी एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या दोघांनी शिवीगाळ करुन दगड उचलून त्या तरुणाच्या डोक्यात मारला. त्यानंतर दगड मारणारे दोघे जण कॅनॉल रोडने १३२ झोपडपट्टीच्या दिशेने पळून गेले.
फिर्यादी हे घरापासून खाली उतरुन घटनास्थळी आले. तोपर्यंत काही जण जमले होते.
पप्पु भरेकर यांनी ११२ ला फोन करुन पोलिसांना बोलावले. सुरज चलवादी याला ससून रुग्णालयात
दाखल करण्यात आले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे़.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा