Parvati Pune Crime News | पोलिसांचा रुट मार्च अडवून रिक्षाचालकाने मारहाण करत पोलिसांचा शर्ट फाडला

रिक्षाचालकाच्या पत्नीने महिला पोलिसांच्या हाताचा घेतला चावा
पुणे : Parvati Pune Crime News | विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने परिसराची माहिती व्हावी, यासाठी पोलिसांबरोबर बंदोबस्ताला आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीसह रुट मार्च केला जातो. जनता वसाहतीत रिक्षाचालकाने पोलिसांचा रुट मार्च अडवला. पोलिसांना मारहाण केली. त्याच्या पत्नी व आईने महिला पोलिसांचा चावा घेतला. (Attack On Cops)
याबाबत अविनाश उत्तम कांबळे (वय ३५, रा. पर्वती) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ दास चौधरी (वय ४०, रा. पर्वती) या रिक्षाचालकाला अटक केली आहे. त्याची पत्नी राणी सोमनाथ चौधरी आणि आई सिताबाई दास चौधरी (रा. जनता वसाहत, पर्वती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जनता वसाहतीतील शंकर मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी ६ वाजता घडला. (Parvati Pune Crime News )
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पोलीस ठाण्यातील ७ पोलीस अधिकारी, ४३ पोलीस अंमलदार, बीट मार्शल व सीमा सुरक्षा दलाची एक तुकडी, एक बुलेरो गाडी असे पायी रुटमार्च जनता वसाहतीत करत होते. रुटमार्च पूर्ण होऊन परतीच्या मार्गावर असताना जनता वसाहत येथे आला. त्यावेळी गल्ली नं. १०८ चे दिशेने रिक्षाचालक जात होता. बीट मार्शल खाडे व सुर्वे यांनी बुलेरो वाहन जाण्यासाठी त्याला रिक्षा रस्त्याचे बाजुला घेण्याची विनंती केली.
त्याने रिक्षा बाजूला न घेता रस्त्यामध्ये आडवी लावून रस्ता अडविला. पोलिसांना अर्वाच्छ शिवीगाळ
करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी त्याची समजूत काढली. परंतु तो पुन्हा शिवीगाळ करुन लागला.
तेव्हा लोकांची गर्दी जमली. त्याला बाजूला बोलावून घेतले. तेव्हा त्याने पत्नी आणि आईला बोलावून घेतले.
फिर्यादी हे तेथे गेले व त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगून त्याला रस्त्यावरुन बाजूला
करण्यासाठी गेले असता त्याने फिर्यादीच्या अंगावरील शर्ट फाडला.
त्याच्या बरोबरच्या दोन महिलांनी रस्त्याच्या बाजुला पडलेला दगड पोलिसांना फेकून मारला.
तो खाडे यांच्या हाताला लागला. त्यानंतर हा रिक्षाचालक अंगावरील कपडे काढून त्या ठिकाणी
रस्त्यावर लोळु लागला. त्यामुळे त्याच्या अंगाला जखमा झाल्या. महिला पोलिसांनी त्याची
पत्नी व आईला बाजूला करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी महिला पोलिसांच्या हाताला चावा घेऊन
त्यांच्याशी झटापट केल्याने त्यांच्या पोटाला व हाताला मार लागला.
शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेऊन अटक केली.
सहायक पोलीस निरीक्षक धावटे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा