Parvati Pune Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून वारंवार पाठलाग करुन रिक्षाचालकाने केला विनयभंग
पुणे : Parvati Pune Crime News | रिक्षाने जात असताना तू मला आवडते, आपण पळून जाऊन लग्न करु, तुझ्या शिक्षणाचा सर्व खर्च मी करतो, असे म्हणून अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिचा विनयभंग (Molestation Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका ३६ वर्षाच्या महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली असून रिक्षाचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जनता वसाहत पोलीस चौकीजवळ (Janta Vasahat Police Chowki) २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १४ वर्षांची मुलगी रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षाचालक तिच्याकर्ड वाईट नजरेने पहात होता.
जनता पोलीस चौकीजवळून जात असताना तो तिला म्हणाला की, तू मला आवडतेस, आपण दोघे पळून जाऊन लग्न करु.
तुझ्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च मी करतो, असे म्हणून तिची इच्छा नसतानाही वारंवार पाठलाग करुन तिचा विनयभंग केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा