Passwords Unsafe | बँक अॅप आणि ATM पासवर्ड बाबत भारतीयांचा निष्काळजीपणा, वारंवार करत आहेत ही चूक, तुम्ही करता का…
मुंबई : Passwords Unsafe | जर तुम्ही मोबाईलमध्ये बँकेचे अॅप अथवा इतर फायनान्शियल अॅप वापरत असाल तर तुम्ही थोडे अलर्ट होण्याची गरज आहे. कारण, अनेक भारतीय या अॅपचे पासवर्ड खुपच साधे आणि कमकुवत ठेवतात. एका सर्वेत ही गोष्ट समोर आली आहे की, प्रत्येक ६ पैकी एक भारतीय (जवळपास १७ टक्के) महत्वाचे फायनान्शियल पासवर्ड असुरक्षित पद्धतीने ठेवतात.
हे १७ टक्के लोक एटीएम, डेबिट अथवा क्रेडिट कार्ड, बँक खाती आणि अॅप स्टोअरचे महत्वाचे पासवर्ड असुरक्षित पद्धतीने ठेवतात (स्टोअर करतात), ज्यामध्ये त्यांची कॉन्टॅक्ट लिस्ट अथवा मोबाईल फोनवर नोट यांचा समावेश आहे, ज्यामधून डेटा चोरी होण्याचा धोका वाढतो.
लोकल सर्कलद्वारे करण्यात आलेल्या सर्वेत देशातील ३६७ जिल्ह्यातील ४८,००० पेक्षा जास्त लोकांनी उत्तरे दिली. यामध्ये सांगण्यात आले की, ३४ टक्के लोकांनी म्हटले की, ते आपले पासपर्ड इतरांसोबत शेयर करतात. लोकल सर्कलने म्हटले की, यावर्षी मे मध्ये, रिझर्व्ह बँकेने मागील दोन वर्षात बँक फसवणुकीत ३०० टक्के वाढीचा खुलासा केला होता.
सर्वेक्षणानुसार, जवळपास दोन-तृतीयांश लोकांनी म्हटले की, ते महत्वाचे पासवर्ड आपल्या जवळ ठेवतात,
तर उर्वरित ३४ टक्क्यांनी म्हटले की, ते शेयर करतात. काही लोकांनी सांगितले
की, पासवर्ड शेयर करण्याचा एक मोठा भाग एक अथवा जास्त कुटुंबाच्या सदस्यांसोबत होतो.
तर काहीजण तो घरगुती अथवा कार्यालयीन कर्मचारी आणि मित्र यांच्यासोबत शेयर करतात.
सर्वेक्षणात असेही म्हटले आहे की, ५३ टक्के लोकांनी सांगितले
की, ते स्वता अथवा त्यांच्या जवळच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने मागील पाच वर्षात आर्थिक फसवणुकीचा अनुभव घेतला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर