Patthe Bapurao Award | पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर ! घोटकर, लोदगेकर, उगले पुरस्काराचे मानकरी; पांडुरंग घोटकर यांना पठ्ठे बापुराव पुरस्कार

Patthe Bapurao Award | Patthe Bapurao Foundation awards announced! Ghotkar, Lodgekar, Ugle award recipients; Pandurang Ghotkar to be awarded Patthe Bapurao Award

पुणे : Patthe Bapurao Award |  पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय  ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ जेष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी यांना जाहीर झाला आहे. पवळा ‘ पुरस्कार मोडनिंब येथील लावणी नृत्यांगणा प्रमिला लोदगेकर यांना व तमाशा साहित्यिक  ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’  जालना येथील शाहीर आप्पासाहेब उगले यांना देण्यात येणार आहे.अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे यांनी दिली. 

पुरस्काराचे हे २७ वे वर्ष आहे.शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार २१ हजार रुपये, पवळा आणि बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार प्रत्येकी १५  हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.पुरस्कार वितरण समारंभ रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी सायंकाळी ५  ते रात्री १०  वाजेपर्यंत लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोक कलेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी कार्यक्रम विनाशुल्क आहे.महिलांसाठी राखीव जागा आहेत. मोडनिंब, सणसवाडी व महाराष्ट्रातून आलेल्या विविध संगीत पार्टींचे कलावंत आपली कला लावणी महोत्सवात सदर करणार आहेत.

लोककला क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या  व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पठ्ठे बापूराव पुरस्कार प्राप्त पांडुरंग घोटकर यांनी हजारो कलावंतांना साथ संगत केली आहे. कलावंतांच्या तीन पिढ्यांना ते लोककलेचे  प्रशिक्षण देत आहेत. प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने शकुंतला नगरकर,छाया खुटेगावकर, संजीवनी मुळे,रघुवीर खेडकर, लक्ष्मीबाई तांबे, सरस्वतीबाई कोल्हापूरकर अशा जुन्या पिढीतील नामवंत कलावंताना सन्मानित करण्यात आले आहे.

You may have missed