Paud Pune Crime News | शाळेत शिक्षकाकडून 19 विद्यार्थिनींचा विनयभंग; मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील धक्कादायक घटना, शिक्षक अटकेत
पुणे : Paud Pune Crime News | मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) आंदगाव येथील एका शाळेतील शिक्षकाने तब्बल 19 विद्यार्थिनींचा विनयभंग (School Girl Molestation Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पौड पोलिसांनी (Paud Police Station) शाळेच्या उपशिक्षकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे (Jalandar Namdev Kamble) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांबळे विद्यार्थिनींना शिकवताना अश्लिल भाषेत बोलतो तसेच मारहाण करतो अशी माहिती शाळा व्यवस्थापनाला मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी संस्थेच्या कार्यकारिणी समितीमधील सदस्य शाळेत चौकशीसाठी गेले होते. त्यावेळी 19 विद्यार्थिनींनी सदस्यांना कांबळे विषयी लेखी अर्ज दिला. त्यानंतर शाळेकडून तक्रार देण्यात आली. कांबळे मुलींशी लगट करायचा. फळ्यावर अश्लिल शब्द लिहायचा. एका मुलीच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याने तिला मिठी मारली होती. त्यावेळी इतर विद्यार्थिनी ओरडल्याने त्याने तिला सोडले. तो वर्गामध्ये विद्यार्थिनींच्या जवळ जात असे, त्यांच्या कानात बोलायचा, ओरडायचा. त्यांच्या हाताला स्पर्श करून डोक्यावर डोके आपटायचा. मुलींनी त्यास विरोध केला तर तो त्यांना मारहाण करत असे. असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी कांबळेला अटक केली. (Paud Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी