Paud Pune Crime News | पुणे : पठाणी वसुली करणारा हडपसरमधील सावकार ‘गोत्यात’ ! 6 लाखांवर 55 लाख दिले तरी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी
पुणे : Paud Pune Crime News | सॉफ्टवेअर कंपनी दिवाळखोरीत गेल्याने देणी भागविण्यासाठी सावकाराकडे १० लाख रुपये मागितले. त्याने बँकेतून ८ लाख काढले, २ लाख व्याज म्हणून कापून घेतले. ६ लाख हातावर टिकविले. एटीएम कार्ड काढून घेतले. दर महिन्याला जमा होणारा पगार तो काढून घेत होता. ५५ लाख रुपये दिल्यानंतरही आणखी पैसे मागत जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी दिल्याने शेवटी तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. (FIR On Money Lender)
याबाबत भुकूम येथील एका ४७ वर्षाच्या नागरिकाने पौड पोलिसांकडे (Paud Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रवि नरसिंग पवार Ravi Narsingh Pawar (रा. हडपसर) व त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० ऑगस्ट २०२३ ते १७ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला. (Hadapsar Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सध्या खराडी येथील एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करीत आहेत. त्यांनी २०१८ मध्ये एका सॉफ्टवेअर कंपनी काढली होती. ती दिवाळखोरीत निघाल्यामुळे त्यांनी गावाकडील शेती विकून कंपनीची काही देणी भागविली. पैसे शिल्लक नसल्याने त्यांनी मित्रांकडे पैसे मागितले. पण कोणी त्यांना पैसे दिले नाहीत. एकाच्या ओळखीतून रवि पवार याच्याकडे १० लाख रुपये मागितले. त्याने बँकेतून ८ लाख रुपये काढले. पण, फिर्यादीच्या हातात फक्त ६ लाख रुपये दिले. २ लाख रुपये व्याज म्हणून काढून घेतले. दुसर्या दिवशी रवि पवार याने सांगितले की, दर महिना मी मागेल तेवढे पैसे मला द्यायचे. तू वेळेवर देशील याची खात्री नाही. तु तुझे एटीएम कार्ड दे, ज्या दिवशी तुझा पगार येतो, ते एटीएममधून काढून घेईन. पैसे फिटले की तुला कार्ड परत करेल, असे म्हणून तो कार्ड घेऊन गेला.
त्यानंतर त्याने व त्याच्या नातेवाईकांनी वेळोवेळी हजारो रुपये काढले. त्याने सांगितल्यावरुन फिर्यादी यांनी अनेकांच्या खात्यात पेसे पाठविले. अशा प्रकारे ६ लाखांच्या बदल्यात वेळोवेळी ५५ लाख ७१ हजार रुपये दिले. तरी वेळेवर पैसे देता आले नाही म्हणून रवि पवार याने फिर्यादीला मगरपट्टा येथे बोलावून घेतले. त्याने व त्याच्या चार साथीदारांनी हाताने मारहाण केली.
मी सांगतो तेवढे पेसे दिले नाहीत तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिली.
त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण (PI Sandeep Chavan) तपास करीत आहेत. (Paud Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत