PCMC News | ध्वजारोहण सुरु असताना पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांची गाडी तरुणाने फोडली; घटनेने शहरात खळबळ
पिंपरी : PCMC News | पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri Chinchwad Municipal Corporation – PCMC) ध्वजारोहण सुरु असताना आयुक्त शेखर सिंह (IAS Shekhar Singh) यांचे वाहन अंध व्यक्तीने फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या चार वर्षांपासून मी रमाई योजनेअंतर्गत घराची मागणी करत आहे. मात्र ते अद्याप पर्यंत मिळाले नाही. माझ्या टपरीवर महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे.
अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या माणसांना जाब विचारला असता त्यांनी शेखर साहेबांनी फक्त अपंगांना त्रास देण्यास सांगितल्याचा दावा अंध तरुणाने केला आहे. या रागातून त्याने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. महानगर पालिकेत स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असताना एका अंध व्यक्तीने ही गाडी फोडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सामान्यांसाठी लोकशाही संपलेली आहे. सध्या फक्त हुकूमशाही सुरु आहे. या अधिकाऱ्यांना लोकशाहीची जाणीव करून देण्यासाठी ही गोष्ट केल्याचे या अंध व्यक्तीकडून सांगण्यात आले आहे. तसेच गाडी फोडल्यानंतर पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन मारहाण देखील केली असेही अंध व्यक्तीचे म्हणणे आहे. (PCMC News)
या घटनेवेळी संबंधित अंध व्यक्तीसोबत आणखी कोण होते, याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
या घटनेचा पुढील तपास करणे सुरु आहे. याबाबत आयुक्तांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा