PCMC News | अतिक्रमण कारवाईस टाळाटाळ; पिंपरी महापालिकेच्या उपायुक्त, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नोटिसा

PCMC-News

पिंपरी : PCMC News | शहरातील विविध भागातील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, हॉटेल, पब आणि बारवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त, सहा क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह नऊ जणांना नोटीसा दिल्या आहेत. तसेच नदीकाठच्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्याबाबत महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना (Pavana River) , इंद्रायणी (Indrayani River) आणि मुळा (Mula River) या तीन नद्या वाहतात. नदीकाठी मोठ्या प्रमाणात भराव आणि अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या पावसात नदीकाठच्या रहिवासी भागात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. पाच हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. तसेच शहरातील विविध भागांतही अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, पादचारी मार्गावरील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यावर कारवाईसाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कानाडोळा केला जात होता. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त, सहा क्षेत्रीय अधिकारी, दोन बीट निरीक्षक अशा नऊ जणांना नोटिसा बजावल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली.

नदीकाठच्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अशा अतिक्रमणांवर आता कारवाई करायची की पावसाळ्यानंतर, याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. शहरात महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत.

या आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत अनधिकृत बांधकामे, पत्राशेड आहेत. मात्र, अतिरिक्त आयुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त, सहा क्षेत्रीय अधिकारी आणि दोन बीट निरीक्षक अशा नऊ जणांना नोटीस दिली आहे. मात्र, यामध्ये दोन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अभय दिल्याचे सांगण्यात आले.

शहरात कोणत्या भागात अतिक्रमण झाले आहे , किती अतिक्रमण धारकांना नोटीसा दिल्या
किती जणांवर कारवाई केली याची सर्व माहिती व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र उपायोजना विकसित ( ॲप ) करण्यात येत आहे.

शहरात विविध भागात सर्वपक्षीय राजकीय पक्षांच्या नेत्यांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची १०७ हॉटेल्स,
पब आणि बार आहेत. ५० वर्षे जुनी हॉटेल आहेत.
त्यामुळे अशा हॉटेलवरील कारवाईचा निर्णय आयुक्तांशी चर्चा करून घेतला जाईल. असे जांभळे यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”

Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात

Maharashtra Assembly Election 2024 | मनसे पुण्यातील सर्व जागा लढण्याच्या तयारीत; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”

You may have missed