Pimpri Accident News | अल्पवयीन टेम्पोचालकाच्या धडकेत मुलाचा मृत्यु; मुलासह टेम्पो मालकावर गुन्हा दाखल

Nashik Accident News | Early morning havoc on Malegaon-Manmad Road: Four killed, more than 20 injured in horrific travel-pickup accident

पिंपरी : Pimpri Accident News | अल्पवयीन असताना आणि लायसन्स नसतानाही तीन चाकी टेम्पो भरधाव चालवून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (Bhosari MIDC Police) अल्पवयीन मुलासह त्याला टेम्पो चालविण्यास देणार्‍या टेम्पोमालकावर गुन्हा दाखल केला आहे.

श्रीनिवास थोरात (रा. राजवाडा, इंद्रायणीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो मालकाचे नाव आहे. याप्रकरणी लांडेवाडी येथील एका महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यासमोर रविवारी दुपारी साडेचार वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांचा मुलगा (वय १२) व त्याची लहान बहिण (वय ७) यांना क्लास सुटल्यावर घरी इंद्रायणीनगर येथे दुचाकीवरुन जात होत्या. एम आय डी सी भोसरी पोलीस ठाण्याच्या समोरील चौकातून उजवीकडे पी सी एन डी टी सर्कलच्या दिशेने पोलीस ठाण्यासमोरुन जात असताना संत नगर चौकाकडून सर्व्हिस रोडने अल्पवयीन मुलाने तीन चाकी टेम्पो घेऊन येऊन फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात त्यांचा १२ वर्षाचा मुलाचा मृत्यु झाला तर त्याची बहिण जखमी झाला.
टेम्पो मालक श्रीनिवास थोरात याने मुलगा अल्पवयीन असल्याचे माहिती असताना व त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना
नसतानाही त्याला तीन चाकी टेम्पो चालविण्यास दिल्याने हा अपघात झाल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चिट्टमपल्ले तपास करीत आहेत. (Pimpri Accident News)

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट? अमित शहांना राऊतांचा फोन?
या चर्चेवर काँग्रेसचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न’

Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण

Ravindra Dhangekar | दिवाळी कीट वाटपप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल;
धंगेकर म्हणाले – ‘नागरिकांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलित व्हावी, म्हणून…’

You may have missed